नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वादग्रस्त रिल्स तयार करून सोशल मिडीयावर प्रसारीत करणा-या तरुणांविरुध्द पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली. त्यामुळे या तरुणांला हे रिल्स बनवने व ते सोशल मीडियावर प्रसारीत करणे चांगलेच महागात पडले आहे. पोलिसांनी सर्व सामान्यांसाठी ८२६३९९८०६२ हा व्हॉटसअप नंबर जारी केला आहे. याच नंबरवर एका जागृत नागरीकाने एक व्हायरल रिल्स पाठवला. त्यानंतर त्याची दखल पोलिसांनी घेतली. आता या तरुणाचा शोध घेऊन त्याच्यावर पोलिसांनी कारवाई केली.
पोलिसांच्या पथकाने तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे ओंकार खंडू बोडके (१९ रा. वाघाडी तालिम पंचवटी) या युवकास हुडकून काढले. त्याने माफी मागूनही त्याच्याविरूध्द प्रतिबंधात्मक कारवाई केली. यावेळी पोलिसांनी वादग्रस्त आणि धमकविणारे रिल्स बनविणा-यांवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. ही कारवाई युनिटचे वरिष्ठ निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक उपनिरीक्षक रविंद्र बागुल, हवालदार नाजीम पठाण, पोलिस नाईक महेश साळुके, अंमलदार राजेश राठोड आदींच्या पथकाने केली.
सोशल मीडियावर रिल्स बनवणे व ते प्रसारीत करणे कसे महागात पडू शकते हे तरुणाच्या कारवाईमुळे पुढे आले आहे. ब-याच वेळा रिल्स बनवतांना त्यातून कायद्याचे उल्लंघन होत नाही ना याचा विचार करत नाही. त्यामुळे असे प्रकार होतात. त्यामुळे रिल्स बनवतांना काळजी घेणे गरजेचे आहे. नाहीतर पोलिसांची करडी नजर तुमच्यावर कारवाई करु शकते….
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten
Whatsapp Helpline Viral Reels Video