नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शस्त्रांचा धाक दाखवून दहशत निर्माण करणा-या दोघांवर पोलिसांनी कारवाई करुन त्यांच्या ताब्यातून दोन तलवारी, लोखंडी चॉपर व चाकू हस्तगत केला आहे. औद्योगीक वसाहतीतील वेगवेगळय़ा ठिकाणी पोलिसांनी ही कारवाई केली. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात वेगवेगळे शस्त्रबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पहिली कारवाई श्रमिकनगर भागातील कार्बननाका भागात करण्यात आली. साहील नरूद्दीन सय्यद (१९ रा.दत्तमंदिर चौक,शिवाजीनगर) हा युवक दुपारच्या सुमारास कार्बन नाका भागातील देशी दारू दुकानाजवळ दहशत माजवितांना मिळून आला. सातपूर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या असता त्याच्या अंगझडतीत धारदार चाकू आढळून आला. संशयिताकडून चाकू हस्तगत करण्यात आला असून याप्रकरणी अंमलदार अनंता महाले यांनी तक्रार दाखल केली आहे.
दुसरी कारवाई हिंदी शाळा भागात करण्यात आली. येथे एक तरूण दहशत माजवित असल्याची माहिती शहर गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकास मिळाली होती. त्यानुसार सायंकाळच्या सुमारास पथकाने धाव घेतली असता सोहम हाईटसजवळील मोकळया जागेत योगेश विश्वनाथ शिंदे (३८ रा. सोहम हाईटस,हिंदी शाळेजवळ श्रमिकनगर) हा दहशत माजवितांना मिळून आला. संशयिताच्या ताब्यात दोन तलवारी व एक धारदार चॉपर मिळून आला असून याप्रकरणी अंमलदार प्रविण वानखेडे यांनी फिर्याद दिली आहे. दोन्ही घटनांप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून अधिक तपास पोलिस नाईक वाघमारे आणि हवालदार आहेर करीत आहेत.
शहरातून दोन मोटारसायकल चोरीला
शहरात वेगवेगळया भागात पार्क केलेल्या दोन मोटारसायकली चोरट्यांनी लंपास केल्या. याप्रकरणी पंचवटी आणि मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हयाची नोंद करण्यात आली आहे. पहिली चोरी व्दारका परिसरात झाली. सचिन मुरलीधर खरोटे (रा.सीडनी टावर्स,कॅमल हाऊस मागे,जनरल वैद्यनगर) यांची पल्सर एमएच ४८ एई २९९१ गेल्या बुधवारी (दि.२३) रात्री त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना चोरट्यांनी ती पळवून नेली. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली आहे.
दुस-या घटनेत दिंडोरी तालुक्यातील करंजवण येथील विलास धोंडीराम घरटे हे गेल्या शनिवारी (दि.२६) नातेवाईकांना भेटण्यासाठी फुलेनगर भागात आले होते. पाटाजवळील भंगार दुकानासमोर पार्क केलेली त्यांची स्प्लेंडर एमएच १५ एझेड ४५९३ चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हयाची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक शिंदे करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten