नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात असून वेगवेगळया भागात पार्क केलेल्या दोन मोटारसायकली चोरट्यांनी नुकत्याच पळवून नेल्या. याप्रकरणी अंबड आणि उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिली घटना नाशिक पुणे रोडवरील आयनॉक्स थिएटर भागात घडली. संजय तुकाराम नरूटे (रा.नरसिंहनगर,गंगापूररोड) हे गेल्या शुक्रवारी (दि.१६) आयनॉक्स थेअटर भागात गेले होते. थेअटरच्या पार्किंगमध्ये लावलेली त्यांची दुचाकी एमएच ११ एएम ६०४६ चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस नाईक बोडके करीत आहेत.
दुस-या घटनेत पाथर्डी फाटा परिसरातील राहूल रमेश कांबळे (रा.मुरलीधरनगर) हे शुक्रवारी (दि.२३) सिडकोतील संभाजी स्टेडिअम भागात गेले होते. स्टेडीअम परिसरात पार्क केलेली त्यांची अॅक्टीव्हा एमएच १५ सीजे ८०५१ चोरट्यांनी पळवून नेली. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार राऊत करीत आहेत.