नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- टाकळीरोडवरील काठे मळा भागात मिठाई दुकान फोडून चोरट्यांनी सुमारे दीड लाख रूपये किमतीचे खाद्यपदार्थ चोरून नेले. याप्रकरणी टेकचंद अर्जुनदास मगरमलाणी (रा.गणेश नगर,काठेगल्ली) यांनी तक्रार दाखल केली असून भद्रकाली पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मगरमलाणी यांचे काठेमळा भागात अनमोल फ्रुटस नावाचे मिठाईचे दुकान असून, गुरूवारी (दि.३) रात्री ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी बंद दुकानाचे शटरचे कुलूप तोडून दुकानातील अमुल बटर, अमुल चिज तसेच नर्डी लाईट बटर अशी सुमारे १ लाख ४५ हजार ४४० रूपये किमतीची विक्रीसाठी ठेवलेली खाद्यपदार्थचा साठा चोरून नेला. अधिक तपास उपनिरीक्षक पवार करीत आहेत.
हिरावाडीत एकाची आत्महत्या
हिरावाडी भागात ५७ वर्षीय व्यक्तीने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना घडली. धनंजय सुरेश भालेराव (रा.रविकिरण सोसा.भोजणीपार्क समोर,हिरावाडी) असे मृत इसमाचे नाव आहे. भालेगाव यांच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होवू शकले नाही. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
भालेराव यांनी शनिवारी (दि.५) आपल्या राहत्या घरात अज्ञात कारणातून विषारी औषध सेवन केले होते. ही बाब निदर्शनास येताच पुतण्या प्रेम भालेराव याने त्यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता डॉ. अतुल काळे यांनी त्यांना तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार घुगे करीत आहेत.
nashik city crime police theft mithai shop suicide