नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिंदेगावातील बेकायदा घरगुती सिलेंडरमधून वाहनात गॅस भरून देणारा अड्डयावर पोलिसांनी कारवाईत करत एकास अटक करुन गॅसभरण्याची साधणे व रिकामी आणि भरलेली सिलेंडर असा सुमारे ७५ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात जीवनावश्यक वस्तू कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदे ता.जि. नाशिक येथील एका कॉम्प्लेक्स जवळ घरगुती सिलेंडरमधून वाहनात गॅस भरून दिला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. नाशिकरोड पोलिसांनी शुक्रवारी (दि.१७) सापळा रचून ही कारवाई केली असून, गणेश चंद्रभान जाधव (३२ रा.बंगालीबाबाजवळ,पळसे) या संशयितास बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. भुजबळ कॉम्प्लेक्स जवळील एका गाळ््यात राजरोसपणे बेकायदा हा धंदा सुरू होता. .या कारवाईत गॅस भरण्याचा इलेक्ट्रीक पंप,मोटार पिस्टन,एचपी व भारत गॅस कंपनीच्या दोन सिलबध्द व दहा गरगुती वापराचे गॅस सिलेंडर एचपी कंपनीचे अर्धवट भरलेले व रिकामे असे ५ व्यावसायीकाचे सिलेंडर मिळून आले. पोलिसांनी घटनास्थळावरून मुद्देमाल हस्तगत केला असून पोलिस नाईक सचिन गावले यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार व्ही.व्ही.काकड करीत आहेत.