नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – साईनाथ नगर भागात इलेक्ट्रीक वायरचा शॉक लागल्याने ४७ वर्षीय पेंटरचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली. कलर काम करीत असतांना हा शॅाक लागला. संदिप बाळू पगारे (रा.एकलहरा ना.रोड) असे मृत पेंटरचे नाव आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पगारे हे गेल्या मंगळवारी (दि.१४) साईनाथनगर येथील मिन्नत स्कूल भागात एका घराचे रंगकाम करीत असतांना ही दुर्घटना घडली होती. घराबाहेरील भिंतीस रंग देत असतांना त्यांना इलेक्ट्रीक वायरचा शॉक लागला होता. या घटनेत ते गंभीर भाजले गेल्याने मित्र मोहम्मद शेख यांनी त्यांना तातडीने जिल्हारूग्णालयात दाखल केले असता गुरूवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला. अधिक तपास पोलिस नाईक टेमगर करीत आहेत.