नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मायलेकीवर चाकूने वार करुन नंतर स्वतःवर चाकूने वार करून आत्महत्या करण्याची धक्कादायक घटना भरदिवसा शुक्रवारी उपनगर पोलीस ठाण्याजवळ असलेल्या केंद्रीय विद्यालयाच्या गेट समोर घडली. सरजीत झांजोटे उर्फ दिंगिया याने या मायलेकीवर वार करून घटनास्थळावरून पळ काढला होता. त्यानंतर त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. जेलरोड येथे राहणा-या अर्चना बाळासाहेब वाघमारे या त्यांच्या मुलीसोबत जात असताना हा हल्ला सरजीतने केला. या हल्ल्यात अर्चना व त्यांची सोळा वर्षाची मुलगी श्रृती ही सुध्दा गंभीर जखमी झाली आहे. त्यांच्यावर नाशिक रोड येथील रुग्णालयात उपचार सुरु आहे. तर जखमी हल्लेखोराला नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हा हल्ला का करण्यात आला. या सर्व कारणांचा पोलिस शोध घेत आहे.