नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लग्नाचे आमिष दाखवून तरूणीवर तीन वर्ष वेळोवेळी बलात्कार केल्याची तक्रार तरुणाच्या कुटुंबियांकडे घेऊन जाणा-या तरुणीला आई वडियांनी शिवीगाळ करुन दमदाटी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात संशयितासह त्याच्या आई वडिलांविरोधात बलात्कारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मखमलाबाद रोडवरील रामकृष्णनगर भागात राहणा-या पीडितेने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पीडितेच्या घर परिसरात राहणा-या संशयिताने २०१९ मध्ये तरूणीची भेट घेत ओळख निर्माण केली होती. या ओळखीचे रूपांतर कालांतराने दोघांच्या प्रेमात झाले. संशयिताने मुलीचे घर गाठून लग्नाचे आमिष दाखवित वेळोवेळी तिच्यावर बलात्कार केला. प्रेमप्रकरणास तीन वर्ष उलटूनही संशयित लग्नासाठी पुढाकार घेत नसल्याने युवतीने तगादा लावला असता त्याने टाळाटाळ केली. अखेर मुलीने संशयिताचे घर गाठून त्याच्या आई वडिलांकडे आपबिती कथन केली असता त्यांनीही मुलीस धमकावित शिवीगाळ केली. त्यामुळे वैफल्यग्रस्त तरूणीने पोलिसात धाव घेतली असून अधिक तपास उपनिरीक्षक माळी करीत आहेत.