नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महामार्गावरील डाटामॅटीक्स इमारती समोरील उड्डाणपूलावर भरधाव अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ३३ वर्षीय दुचाकीस्वार ठार झाला. बालाजी दामू धारबळे (रा.हनुमाननगर,खेरवाडी ता.निफाड) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. धारबळे गेल्या रविवारी (दि.१२) द्वारका बाजूकडून मुंबईच्या दिशेने आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. मुंबईनाका भागातील डाटामॅटीक्स इमारती समोरील उड्डाणपूलावरून तो एमएच १५ सीवाय ४९४८ या दुचाकीवरून प्रवास करीत असतांना पाठीमागून भरधाव आलेल्या अज्ञात वाहनाने दुचाकीस धडक दिली. या अपघातात धारबळे गंभीर जखमी झाला होता. रूग्णालयात उपचार सुरू असतांना त्याचा मृत्यू झाला. याबाबत मृताचा भाऊ प्रभाकर धारबळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिस दप्तरी अपघाताची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास उपनिरीक्षक सोनवणे करीत आहेत.