नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दहिपूलावरील कानिफ रेस्टॉरंट मध्ये बेकायदा चालणा-या हुक्कापार्लरवर भद्रकाली पोलिसांनी कारवाई करत चार ग्राहकांसह तब्बल दहा जणांवर गुन्हा दाखल करुन ६५ हजार २९४ रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. जय कैलास गजरा (रा.मालाड,मुंबई),जावेद अली सत्तार अली (मुळ रा.भानमारी जि.कामगाद,आसाम),राजूल इस्लाम जमीरोद्दीन (मुळ रा.जमुना मौदंगा, हरीखाली,आसाम), मेराजुब इस्लाम अब्दूल जलील (मुळ रा.चोटीयन नागाव,जुरिमा आसाम),राज केशव ठाकूर (मुळ रा. भौर्यागाव पिथोळागड,उत्तराखंड),रायसूल अलीमउद्दीन (मुळ रा.डबका सर्कल जि.हुर्जाद,आसाम),विशाल विकास कुमट व विजय गुरूमूख नंदवाणी (रा.दोघे मिस्त्री पार्क अपा.आदित्यकुंज कॉलनी दिंडोरीरोड), कुणाल प्रमोद भटेवरा (रा.पिंपळगाव ब.ता.निफाड) व शुभम उत्तम खोडे (रा.शुभम बंगलो,सावरकरनगर) अशी कारवाई करण्यात आलेल्या संशयितांची नावे असून त्यातील चार जण हुक्का सेवन करतांना मिळून आलेले ग्राहक आहेत. अमली विरोधी पथकास मंगळवारी (दि.१४) दहिपूल येथील कानिफ रेस्टॉरंटमध्ये हुक्कापार्लर सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार छापा टाकला असता येथे चार जण हुक्काचे सेवन करतांना मिळून आले. या कारवाईत सुमारे ६५ हजार २९४ रूपये किमतीचे वेगवेगळया फ्लेवरची प्रतिबंधीत तंबाखू व हुक्का ओढण्याची साधणे मिळून आली. अंमलदार गणेश वडजे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिस दप्तरी गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सपकाळ करीत आहेत.