नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – स्टार हेल्थ अॅड अलाइड इन्शुरन्स कंपनीतील एरिया मॅनेजर विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला सहका-याच्या इच्छेविरुद्ध वारंवार शारिरीक संबंध प्रस्थापित करून कुटुंबियाना जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे ही घटना पोलिस स्थानकात पोहचली आहे. पीडितेच्या तक्रारीवरुन मुंबई नाका पोलीस ठाण्यात हा बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंपनीचे एरिया मॅनेजर निलेश अनिल कदम असे संशयिताचे नाव आहे.
या कारवाईबाबत पोलिसांनी सांगितले की, स्टार हेल्थ इन्शुरन्स कंपनीचे कालीका मंदिरासमोर कार्यालय आहे. येथे मार्च २०२१ ते डिसेंबर २०२२ दरम्यान ही घटना घडल्याचे तक्रारीवरुन समोर आले. या काळात संशयिताने पीडितेच्या इच्छेविरुद्ध वारंवार संबध प्रस्थापित केले. पण, या सर्व प्रकाराला कंटाळून पीडिता ७ फेब्रुवारी २०२३ ला राजीनामा देण्यासाठी कंपनीत गेली. येथे संशयितांना कुटुंबियाना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर संशयिताने पीडिता ही शारिरीक संबंधसाठी पैशाची मागणी करते अशी बदनामीकारक अफवा ऑफिसमध्ये पसरवली. त्यानंतर पीडितेने पोलिस स्थानका तक्रार दिली. याप्रकरणी सहायक निरीक्षक साजीद मन्सूरी तपास करीत आहेत