नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महामार्गावरील तपोवन क्रॉसिंग भागातील उड्डाणपुलावर भरधाव अज्ञात चारचाकीने दिलेल्या धडकेत २५ वर्षीय दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना घडली आहे. स्वप्निल सुभाष गुंजाळ (रा.जाधव संकुल,अंबड लिंकरोड) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गुंजाळ रविवारी (दि.१२) नाशिककडून आडगावच्या दिशेने आपल्या दुचाकीवर एमएच १५ ईवाय ९३२२ प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. उड्डाणपूलावरून प्रवास करीत असतांना तपोवन क्राॅसिंग भागात पाठीमागून भरधाव आलेल्या अज्ञात वाहनाने दुचाकीस धडक दिली. या अपघातात त्यास गंभीर दुखापत झाल्याने १०८ रूग्णवाहिकेतून त्यास जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉ.राम पाटील यांनी तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार घुगे करीत आहेत.