नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लहवित येथे बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सुमारे साडे सहा लाखाच्या मुद्देमाल लंपास केला. या घरफोडीत चोरट्यांनी ९० हजाराच्या रोकडसह सोन्याचांदीच्या दागिणे चोरुन नेले. या चोरीप्रकरणी छाया सुरेश मुठाळ (रा.जनता विद्यालय पाठीमागे) यांनी तक्रार दाखल केली असून देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुठाळ कुटुंबिय शनिवारी (दि.११) बाहेरगावी गेल्या असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून बेडरूममधील कपात ठेवलेली ९० हजाराची रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ६ लाख ४३ हजार ९८० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास उपनिरीक्षक पाडवी करीत आहेत.