नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दोन गटात तुंबळ हाणामारीत चार जण गंभीर जखमी झाले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात परस्परविरोधी अकरा जणांविरूध्द प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या ११ पैकी तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिस ठाण्यात दाखल असलेला गुन्हा मागे घ्यावा या कारणातून भराडवाडी भागात ही घटना घडली. सुरज रमेश बोडके, विनोद रमेश बोडके व धिरज रमेश बोडके आदींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, संदिप अशोक लाड, शिवा देवराम शिंदे,देवराम लासू शिंदे,रमेश पांडूरंग बोडके,सचिन दिपक शिंदे,प्रेम शिंदे तान्हा देवराम शिंदे,दिपक शिंदे व अन्य चार ते पाच इसम अशी हल्लेखोरांची नावे आहेत. याप्रकरणी पोलिस हवालदार शेळके यांनी तक्रार दाखल केली आहे. या घटनेत तान्हा देवराम शिंदे,देवराम लासू शिंदे, शिवा देवराम शिंदे व संदिप अशोक लाड (रा.भराडवाडी,फुलेनगर) आदी चार जण जखमी झाले आहेत. शिंदे व बोडके या दोन कुटुंबियात पुर्ववैमनस्य आहे. शनिवारी (दि.११) सायंकाळच्या सुमारास दोन्ही गट पेठरोडवरील मच्छीबाजार भागात एकमेकांवर चालून आल्याने ही घटना घडली. जुन्यावादाचा पोलिस दप्तरी दाखल असलेला गुन्हा मागे घ्यावा या कारणात दोन्ही गटात धुमश्चक्री झाली. या हाणामारीत लाठ्या काठ्यांसह धारदारशस्त्रांचा वापर करण्यात आल्याने चार जण जखमी झाले. जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांनी तिघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक खैरनार करीत आहेत.