नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महामार्गावरील कोनार्कनगर भागातील सर्व्हीसरोडवर भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत रस्ता ओलांडणारा ४० वर्षीय पादचारी ठार झाला. अशोक कागडा वळवी (४० रा. लोकधारा सोसा.आडगाव शिवार) असे अपघातात ठार झालेल्या पादचारीचे नाव आहे. वळवी शनिवारी (दि.११) सायंकाळच्या सुमारास कोनार्क नगर भागातील महामार्गाचा सर्व्हीसरोड ओलांडत असतांना हा अपघात झाला. हॉटेल सयाजी पॅलेस येथे ते रस्ता ओलांडत असतांना आडगावकडून नाशिकच्या दिशेने भरधाव जाणाºया अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. जखमी अवस्थेत मुलगा तारणहार वळवी याने त्यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक शिंदे करीत आहेत. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरूध्द आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.