नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विनापरवानगी आंदोलन केल्याप्रकरणी माजी मंत्री शोभाताई बच्छाव, हेमलता पाटील, बबलू खैरे व शरद आहेर या पदाधिका-यांवर मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय जीवन विमा निगम व स्टेट बँक ऑफ इंडियाच्या चुकीच्या धोरणाविरोधात कॉग्रेसच्या वतीने सोमवारी (दि.६) गडकरी चौकातील एलआयसी कार्यालयाच्या प्रवेशव्दारावर आंदोलन करण्यात आले. कुठलीही परवानगी न घेता माजी मंत्री शोभाताई बच्छाव, हेमलता पाटील, बबलू खैरे व शरद आहेर आदींनी १५ ते २० कार्यकर्त्यांसमवेत एकत्र येवून घोषणाबाजी करीत आंदोलन छेडले. पोलिस आयुक्त यांचा शहरात मनाई आदेश जारी असतांनाही संबधीतांनी आंदोलन केल्याचा आरोप तक्रारीत ठेवण्यात आला असून याप्रकरणी पोलिस शिपाई शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस नाईक बिरारी करीत आहेत.