नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सिडको भागातील बुरकुले हॉल परिसरात बहिणीची छेड काढल्यामुळे जाब विचारणा-यासाठी गेलेल्या भावाला व बहिणीला टोळक्याने कोयत्याने वार केल्याची ही घटना रविवारी सायंकाळी घडली. यात भाऊ उमेश भुजबळ याच्या हातवर, कंमरेवर आणि डोक्यावर मार लागला तर बहीण प्रीती हिच्या हातावर कोयत्याचा वार लागल्याने ती देखील जखमी झाली आहे. या दोघांवर जिल्हा शासकीय रुग्णायलाय उपचार सुरू आहे. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेबाबत पोलिसांनी दिलेली माहित अशी की, क्लास संपल्यानंतर बहीण प्रीती ही घरी परतत असतांना काही टवाळखोरांनी तीला बघून अश्लील हाव भाव केले आणि तिची छेड काढली. बहीणीने घडलेला हा सर्व प्रकार घरी आल्यानंतर भावाला सांगितला. त्यानंतर संतप्त भावाने जाब विचारण्यासाठी टोळक्याला गाठले. या टोळक्याने कोयत्याने उमेश भुजबळ यांच्यावर वार केले. यावेळी बहीण प्रीती हिने टवाळखोरांना अडवण्याचा प्रयत्न केला. पण, टोळक्याने तिच्यावर सुध्दा हल्ला केला. या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला. या टवाळखोरांवर त्वरीत कारवाई करत त्यांना अटक करावी अशी मागणी भुजबळ कुटुंबियांनी केली आहे.