नाशिक – येवला तालुक्यातील भारम येथे हॉटेलमालकाने मजुराचा खून केल्याचे समोर आले आहे. आहे. याप्रकरणी हॉटेल मालकावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी शेख जमीर मेहबूब याचे बेस्ट नावाचे हॉटेल आहे. याठिकाणी बाळू गणपत नळे (वय ४९) हे मजुरीचे काम करत होता. ३ जुलै २०२२ रोजी हॉटेलचा मालक शेख जमीर याने हॉटेलमधील कर्मचारी असलेल्या बाळू नळे यांच्यावर कोंबड्या चोरून विक्री केल्याचा आरोप करत मारहाण करण्यास सुरुवात केली. राग अनावर झाल्याने लाथाबुक्यांसह छातीवर, पोटावर पाठीवर गंभीर दुखापत झाली. या घटनेत अतिरक्तस्त्राव शरीरात झाला. त्यांची तब्बेत खालावल्याने त्यांच्यावर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, काल (दि १५) रोजी बाळू नळे यांचा मृत्यू याप्रकरणी मुलगा अर्जुन बाळू नळे यांनी येवला तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक यु. एन. राजपूत करत आहेत.