नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पती आणि त्याच्या प्रेयसीने मानसिक व शारिरीक छळ केल्याने ३० वर्षीय विवाहीतेने आत्महत्या केल्याची तक्रार मृत महिलेच्या पित्याने तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत लग्नातील हुंड्यासह दोन्ही मुली झाल्याने आपल्या मुलीचा छळ करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या तक्रारीवरुन अंबड पोलिस ठाण्यात दोघांविरूध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आनंद दगा पगारे व माया अशोक खोडवे (रा.दोघे अचानक चौक,सिडको) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी बाबुराव भिका गरूड (रा.मालेगाव जि.नाशिक) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. वैशाली आनंदा पगारे यांनी गेल्या २५ जानेवारी रोजी आपल्या राहत्या घरात बेडरूममधील पंख्यास साडी बांधून गळफास लावून घेत आत्महत्या केली. संशयित जावई आनंद पगारे व त्याची प्रेयसी माया खोडवे यांच्या छळास कंटाळून मुलीने आत्महत्या केल्याचा आरोप गरडू यांनी आपल्या तक्रारीत केला आहे. लग्नात हुंडा व दागिणे दिले नाही या कारणातून वैशालीचा छळ सुरू होता. त्यात तिला दोन्ही मुलीच झाल्याने या छळात भर पडली. संशयितांच्या जाचास कंटाळून तिने आत्महत्या केल्याचे म्हटले असून अधिक तपास उपनिरीक्षक किरण शेवाळे करीत आहेत.