नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दांम्पत्याच्या बँक खात्यातील सुमारे ५६ हजार ३१० रूपयांची रोकड परस्पर ऑनलाईन चोरट्यांनी लंपास केले. मोबाईलवर बोलण्यात गुंतवून सायबर फायनान्स कंपनीचे एंजट असल्याची बतावणी करीत ही रक्कम लांबविण्यात आली आहे. याप्रकरणी सुनिल कुमार वर्मा (रा.उत्तमनगर,सिडको) यांनी तक्रार दाखल केली असून अंबड पोलिस ठाण्यात फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रितम झा व जावेद नामक भामट्यांनी हे कृत्य केले आहे. वर्मा गेल्या वर्षी १० जानेवारी रोजी आपल्या कंपनीत काम करीत असतांना त्यांना प्रितम झा व जावेद नामक व्यक्तीचा ७४३९३३६४१० व ८६९५३७२७५३ या मोबाईलवरून फोन आले होते. यावेळी भामट्यानी बजाज फायनान्स कंपनीचे प्रतिनिधी असल्याचे भासवून वर्मा यांना बोलण्यात गुंतविले. या काळात त्यांनी फायनान्स कंपनीच्या कर्जासह गुंतवणुक योजनाची माहिती दिली. वर्मा यांना बोलण्यात गुंतवून संशयितांनी परस्पर मोबाईलच्या माध्यमातून बँक खात्याची गोपनिय माहिती मिळवून ऑनलाईन रकमा लांबविल्या. या घटनेत वर्मा यांच्या युनियन बँक खात्यातील व पत्नीच्या नावे असलेल्या कॅनरा बँक खात्यातील सुमारे ५६ हजार ३१० रूपयांची रोकड भामट्यांनी ऑॅनलाईन लांबविली. अधिक तपास अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक बगाडे करीत आहेत.