नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सहा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणा-या बापास पोलिसांनी गजाआड केले आहे. शोएब नवाज खान पठाण (३३ रा.नाईकवाडीपुरा जुने नाशिक) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात बलात्कार आणि बाल लैगिक अत्याचार संरक्षण (पोक्सो) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयिताच्या पत्नीने या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. २ जून ते डिसेंबर २०२२ दरम्यान संशयिताने हे कृत्य केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. सहा वर्षीय मुलगी आपल्या घरात झोपेत असतांना तसेच पीडितेची आई घरात नसतांना संशयिताने तिचा लैंगिक छळ केल्याचे नमुद करण्यात आले आहे. ही बाब पीडितेच्या आईच्या निदर्शनास येताच तिने पोलिसात धाव घेतली असून संशयितास अटक करण्यात आली आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक संजय बिडगर करीत आहेत.







