नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मखमलाबाद गावात दारूची बेकायदेशीर विक्री करणा-या तरुणाला पोलिसांनी गजाआड करुन त्याच्याकडे असलेला पाच हजाराचा मद्यसाठा जप्त केला आहे. राकेश रामदास गवळी (३२ रा.पिंगळे गल्ली शिवाजी चौक,म.बाद) असे अटक करण्यात आलेल्या दारू विक्रेत्याचे नाव आहे. याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मखमलाबाद मातोरीरोडवरील गोपाळवाडी भागात दारू विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी (दि.३) सायंकाळी पोलिसांनी परिसर पिंजून काढला असता संशयित मद्यविक्री करतांना मिळून आला. त्याच्या ताब्यातील प्लॅस्टीक पिशवीची झडती घेतली असता त्यात सुमारे ५ हजार ६० रूपये किमतीच्या देशी विदेशी दारूने भरलेल्या बाटल्या मिळून आल्या. सशयितास अटक करीत पोलिसांनी मुद्देमाल हस्तगत केला असून याप्रकरणी पोलिस नाईक संदिप निकम यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस नाईक सोनवणे करीत आहेत.