नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पेठरोडवरील अश्वमेधनगर भागात जिना चढतांना तोंडावर पडल्याने १२ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. वैशाली मोहन गोसावी (रा.रिक्षास्टॅण्डजवळ,अश्वमेधनगर) असे मृत मुलीचे नाव आहे. वैशाली गुरूवारी (दि.२) रात्री आपल्या राहत्या रो हाऊस मध्ये जिना चढत असतांना अचानक पाय घसरल्याने तोंडावर पडली होती. या घटनेत तिला मोठी दुखापत झाल्याने कुटूंबियांनी तात्काळ १०८ अॅम्ब्युलन्स पाचारण केली असता डॉ. भाभूम बेंद्रे यांनी तिला उपचारापूर्वीच मृत घोषीत केले. याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास हवालदार भुसारे करीत आहेत.