नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जुगार खेळणा-या तीन जणांवर पोलिसांनी कारवाई करत त्यांच्या ताब्यातून रोकडसह जुगाराचे साहित्य असा सुमारे २ हजार ८४० रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोईन अब्दूल रज्जाक शेख (४८ रा.सादिकनगर,वडाळागाव),दिपक शिवाजी वावळे (३७ रा.भिमवाडी) व समिर विजय यादव (२५ रा.रमाबाई आंबेडकरनगर,खडकाळी) अशी संशयितांची नावे आहेत. फुले मार्केट कॉर्नर येथील मौलानी बाबा दर्गा परिसरात काही युवक जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार भद्रकाली पोलिसांनी धाव घेतली असता संशयित पोलिसांच्या जाळयात अडकले. ते स्व:ताच्या फायद्यासाठी अंक अकड्यावर पैसे लावून टाईम ओपन नावाचा मटका जुगार खेळतांना व खेळवितांना मिळून आले. संशयितांच्या ताब्यातून २ हजार ८४० रूपयांची रोकड आणि जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले असून याप्रकरणी पोलिस नाईक कय्युमअली सय्यद यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस नाईक भोळके करीत आहेत.