नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिंगवे बहुला येथ परवाना असलेल्या पिस्तूलातून एकाने गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली. बाबू मुन्ना कनोजीया (५३ रा.पाटोळे गल्ली,शिंगवे बहुला) असे आत्महत्या करणा-या व्यक्तीचे नाव आहे. कनोजीया यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कनोजीया माजी सैनिक असल्याचे कळते. गुरूवारी (दि.२) रात्री त्यांनी अज्ञात कारणातून आपल्या परवाना असलेल्या सिंगल बोरच्या बंदुकीतून हनवटीवर गोळी झाडून घेतली होती. त्यात त्यांचा मृत्यू झाला. याबाबत शाम कनोजीया यांनी खबर दिल्याने पोलिस दप्तरी मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास उपनिरीक्षक पठाण करीत आहेत.