नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – व्यावसायीक महिलेसह एका विरोधात झाड जतन कायद्यान्वये भद्रकाली पोलिस स्थानकात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महापालिकेची परवानगी न घेता परस्पर वृक्षतोड केल्यामुळे मनपा कर्मचारी किरण बोडके यांनी याप्रकरणी तक्रारी दाखल केली आहे. जुने नाशिक भागातील ओम सर्व्हीस स्टेशन आणि पेट्रोल पंप आवारात असलेले पिंपळाचे झाडाचा विस्तार कमी केल्याप्रकरणी प्रितू जैन या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या २२ डिसेंबर रोजी जैन यांनी आपल्या मालकिच्या पेट्रोल पंप आवारातील झाडाची परवनागी न घेता परस्पर छाटणी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तर मौलिक शहा यांनी २९ डिसेंबर रोजी आपल्या मयुर गॅस एजन्सी परिसरातील पिंपळाचे झाड बुंध्यापासून तोडले. दोन्ही घटनांप्रकरणी वेगवेगळय़ा तक्रारी दाखल करण्यात आल्या असून अधिक तपास पोलिस नाईक बोंबले आणि मगर करीत आहेत.