नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गोल्फ क्लब मैदानावर मॉर्निंग वॉक करीत असतांना पाठलाग करून एकाने महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विलास रामचंद्र नागरगोजे (रा.गायत्रीनगर,नाशिक पुणेरोड) असे संशयिताचे नाव आहे. परिसरातील पीडिता गोल्फ क्लब मैदानावर वॉकिंगसाठी जाते. गेल्या दहा ते बारा दिवसांपासून संशयित तिचा पाठलाग करीत होता. बुधवारी (दि.१) संशयिताने महिलेचा पाठलाग करीत तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. याबाबत महिलेने जाब विचारला असता संशयिताने तिचा विनयभंग केला. दरम्यान यापूर्वीही संशयिताने असे कृत्य केल्याचे पोलिस दप्तरी नमुद करण्यात आले असून अधिक तपास उपनिरीक्षक सोनवणे करीत आहेत.