नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सिडकोतील अश्विननगर भागात सेवानिवृत्त पोलिस अधिका-याचे घर फोडून चोरट्यांनी पिस्तूलसह सुमारे ९२ हजाराचा ऐवज लंपास केला. या चोरीप्रकरणी रामदास देवराम शिंदे (रा.रामव्हीला बंगलो,श्रावण सेक्टर अश्विननगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली असून अंबड पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदे हे सेवानिवृत्त पोलिस अधिकारी आहेत. शिंदे कुटुंबिय मंगळवारी (दि.३१) आपल्या मुळगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद बंगल्याचे कुलूप तोडून बेडरूममधील लाकडी कपाटात ठेवलेली खासगी परवाना असलेली पिस्तूल,जीवंत काडतुसे तसेच घरातील सोने चांदीचे दागिणे व तीन मोबाईल असा सुमारे ९१ हजार ७०० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास उपनिरीक्षक किरण शेवाळे करीत आहेत.