नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मोटारसायकल चोरणा-याला पोलिसांनी गजाआड करुन त्याच्या ताब्यातून दुचाकी हस्तगत केली आहे. आयुश राजेश राका (२० रा.हस्ती बँके मागे,सटाणा रोड पिंपळनेर ता.साक्री) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाविकनगर येथील संतोष विठ्ठल कोरडे (रा.उर्वशी अपा.लोटस हॉस्पिटल समोर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. कोरडे यांची यामाहा एमएच १५ ३२२२ रविवारी (दि.२९) त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना चोरट्यांनी चोरून नेली होती. याबाबत सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी चोरट्यास हुडकून काढले असून त्याच्या ताब्यातून चोरीची दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे. संशयितांच्या अटकेने अनेक गुन्हयांची उकल होण्याची शक्यता पोलिस सुत्रांनी वर्तविली आहे. अधिक तपास पोलिस नाईक लोंढे करीत आहेत.