नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अमरधामरोड भागात गुटख्याची विक्री करणा-या संशयितास पोलिसांनी गजाआड करुन साडे पाच हजार रूपये किमतीचा गुटखा जप्त केला. अझरूद्दीन हमीद शेख (३० रा.बागवानपुरा, अमरधामरोड) असे अटक करण्यात आलेल्या गुटखा विक्रेत्याचे नाव आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बागवानपुरा ते अमरधाम रोड मार्गावर एक तरूण खुलेआम गुटखा विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी (दि.२७) पथकाने सापळा लावून संशयिताच्या मुसक्या आवळल्या. त्याच्या ताब्यात सुमारे ५ हजार ४९० रूपये किमतीचा गुटखा मिळून आला असून याप्रकरणी पोलिस नाईक आर.बी.कोळी यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक खांडवी करीत आहेत.