नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भाजीपाला विक्री दुकानाचे शटर वाकवून चोरट्यांनी गल्यातील सुमारे ३१ हजार रुपये लंपास केले. या चोरीप्रकरणी शत्रुघ्न रामलतन गुप्ता (रा.जनार्दननगर,नांदूरनाका) यांनी तक्रार दाखल केली असून मुंबईनाका पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुप्ता यांचे अशोका मार्ग भागात सानप फार्मस नावाचे भाजीपाला विक्रीचे दुकान आहे. गेल्या बुधवारी (दि.२५) रात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर वाकवून गल्यातील ३० हजार ८२० रूपयांची रोकड चोरून नेली. अधिक तपास हवालदार विजय म्हैसधुणे करीत आहेत.