नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शेवगेदारणा येथे भंडा-याचा प्रसाद घेण्यासाठी मंदिरात गेलेल्या ७३ वर्षीय वृध्दास दोघांनी लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत वृध्द जखमी झाला आहे. चंद्रकांत दत्तात्रेय पाळदे व सोमनाथ हरिभाऊ कासार अशी मारहाण करणा-या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी मोहन नामदेव कासार (रा.शेवगेदारणा ता.जि.नाशिक) यांनी तक्रार दाखल केली असून नाशिकरोड पोलिस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहन कासार हे बुधवारी (दि.२५) गावातील गणपती मंदिरात भंडारा असल्याने प्रसाद घेण्यासाठी गेले असता ही घटना घडली. दोघा संशयितांनी त्यांना जवळ बोलावून घेत मुलाला समजावून सांगण्याचा सल्ला दिला असता कासार यांनी तुम्ही व तो बघून घ्या असे म्हटल्याने संतप्त दोघांनी त्यांना शिवीगाळ करीत लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. यावेळी संशयितांनी त्यांना जमिनीवर पाडून तुला व तुझ्या मुलास बघून घेवू अशी धमकी दिली. अधिक तपास पोलीस नाईक ए.टी.पवार करीत आहेत.