नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतनगर भागात तडिपारावर पोलिसांनी कारवाई करत त्याला अटक केली आहे. अरबाज मोईन बागवान (२३ रा.म्हाडा वसाहत भारतनगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरबाज बागवान याच्या गुन्हेगारी कारवायांमुळे शहर पोलिसांनी त्यास दोन वर्षासाठी हद्दपार केले आहे. शहर आणि जिह्यातून त्यास तडिपार केलेले असतांना त्याचा शहरात वावर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलिस त्याच्या मागावर असतांनाच शुक्रवारी (दि.२७) तो आपल्या राहत्या घर परिसरात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली भारतनगर येथील मोकळ््या जागेत सापळा लावून त्यास अटक केली. याप्रकरणी पोलिस शिपाई पानवळकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार सोनार करीत आहेत.