नाशिक : पंचवटी भागातील दोन अल्पवयीन मुली तीन दिवसांपासून बेपत्ता झाल्या असून त्या एकमेकांच्या शेजारी राहणा-या आहेत. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरात कुणासही काही एक न सांगता त्या निघून गेल्या असून त्यांचे कुणी तरी अपहरण केल्याचा संशय कुटूंबियांना आहे. एका मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही मुली एकमेकांच्या शेजारी असून त्या सोमवारी (दि.२०) दुपार पासून बेपत्ता आहेत. दोन्ही जणी घरात कुणास काही एक न सांगता निघून गेल्या असून त्यांना कुणी तरी कशाचे तरी आमिष दाखवित पळवून नेल्याचा संशय त्यांच्या कुटूंबियांनी वर्तविला आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक डी.पी. खैरणार करीत आहेत.