नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – २८ वर्षीय विवाहीतेने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना पंचवटीतील चिंतामणीनगर भागात घडली.कोमल अभिजीत बेळगावकर (रा.प्रथमेश सोसा.चिंतामणीनगर) असे मृत महिलेचे नाव आहे. बेळगावकर यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बेळगावकर यांनी शुक्रवारी (दि.२७) आपल्या राहत्या घरात अज्ञात कारणातून विषारी औषध सेवन केले होते. ही बाब निदर्शनास येताच सोसायटीच्या सुरक्षारक्षक शंकर नरवळे यांनी त्यांना तात्काळ नजीकच्या लोकमान्य हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचार सुरू असतांना डॉ.ओमकार गवळी यांनी मृत घोषीत केले. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक दिनेश खैरणार करीत आहेत.