नाशिक – १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी बलात्कार केल्या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात बलात्कार,बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक (पोक्सो) कायद्याासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात संशयितास पोलिसांनी अटक केली आहे. मजहर अन्वर खान (२६ रा.संजीवनगर) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी चुंचाळे शिवारातील आंबेडकरनगर भागात राहणा-या १६ वर्षीय पीडितेने तक्रार दाखल केली आहे. पीडिता आणि संशयित पूर्वी एकमेकांचे शेजारी राहत होते. २ एप्रिल २०२२ रोजी संशयिताने तिला गाठून कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देत त्र्यंबकरोडवरील द ग्रेपसिटी या हॉटेलमध्ये नेले. याठिकाणी त्याने तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला. यानंतरही वेळोवेळी धमकी देत त्याने अत्याचार सुरूच ठेवल्याने मुलीने आपबिती कुटुंबियांकडे कथन केल्याने हा प्रकार पोलिसात पोहचला असून, संशयितास अटक करण्यात आली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक सचिन पवार करीत आहेत.