नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दोन वर्ष लग्नाचे आमिष दाखवून तरूणीवर बलात्कार करण्या-याविरुध्द अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी संशयिताला अटक करण्यात आली आहे. विशाल जगदिश परदेशी (३४ रा.पवारवाडी,प्रगतीनगर जेलरोड) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. जाती वाचक भाष्य करीत संशयिताने लग्नास टाळाटाळ केल्याने पीडितेने पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर बलात्कारस अॅट्रोसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंबड औद्योगीक वसाहतीत राहणा-या तरूणीने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. संशयित आणि तरूणीची ओळख २०२० मध्ये झाली होती. या ओळखीचे रूपांतर कालांतराने प्रेमात झाल्याने हा प्रकार घडला. संशयिताने युवतीस विवाहाचे आमिष दाखवित तब्बल दोन वर्ष बलात्कार केला. चुंचाळे शिवारातील घरकुल योजना तसेच दातीरनगर येथील स्वराज अपार्टमेंट मधील एका सदनिकेत घेवून जात तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला. नोव्हेंबर २०२२ पर्यंत हा प्रकार सुरू होता. मात्र दोन वर्ष उलटूनही संशयित लग्नाबाबत वाच्यता करीत नसल्याने तरूणीने त्याच्याकडे तगादा लावला असता ही घटना घडली. लग्न करून तुला घरी नेले तर समाजात बदनामी होईल असे म्हणत त्याने मुलीस जातीवाचक भाष्य केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरूणीने पोलिसात धाव घेतली असून संशयितास अटक करण्यात आली आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सोहेल शेख करीत आहेत.