सिडकोतील उपेंद्रनगर भागात महिलेने केली आत्महत्या
नाशिक : ३२ वर्षीय महिलेने आपल्या राहत्या घरी गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना सिडकोतील उपेंद्रनगर भागात घडली. उर्मिला आनंदा चव्हाण (रा.रिंकी संकुलच्या बाजूला,उपेंद्रनगर) असे मृत महिलेचे नाव आहे. चव्हाण यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. चव्हाण यांनी बुधवारी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात पंख्यास नॉयलॉन दोरीने गळफास लावून घेतला होता. त्यात तिचा मृत्यू झाला. याप्रक्रणी सागर मालपुरे यांनी दिलेल्या खबरीवरून मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक बनतोडे करीत आहेत.
पायी जात असतांना चक्कर येवून पडल्याने ६५ वर्षीय वृध्दाचा मृत्यू
नाशिक : रविवार कारंजा भागात रस्त्याने पायी जात असतांना चक्कर येवून पडल्याने ६५ वर्षीय वृध्दाचा मृत्यू झाला. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वसंत दिगंबर लोखंडे (रा.क्राऊन रेसि.आनंदनगर,पाथर्र्र्र्डी फाटा) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. लोखंडे हे बुधवारी (दि.१३) रात्री रविवार कारंजा भागातील मंगेश मिठाई जवळील बोळीतून पायी जात असतांना ही घटना घडली. रस्त्याने पायी जात असतांना अचानक ते चक्कर येवून पडले होते. या घटनेत बेशुध्द झाल्याने सामाजीक कार्यकर्त्यांनी त्यांना तातडीने जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास पोलिस नाईक महाले करीत आहेत.