नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वडाळागावात तरुणीचा विनयभंग करुन तिच्या वडिलांना शिवीगाळ, दमदाटी करुन मारहाण करणा-या दोन तरुणांविरुध्द फिर्याद दाखल झाली आहे. या प्रकरणी पीडितेने इंदिरानगर पोलिस ठाण्यात मोइन सिकंदर शेख (२९) व रहिम सिकंदर शेख (१९, दोघे रा. म्हाडा वसाहत, वडाळागाव) यांच्याविरोधात ही तक्रार केली आहे. त्यात विनयभंग व मारहाण करण्यात आल्याचे म्हटले आहे. पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, रविवारी (दि.१५) मोइन शेख याने इमारतीत पीडितेचा पाठलाग करीत तिच्यावर शेरेबाजी केली. त्यामुळे पीडितेने ही बाब तिच्या वडिलांना सांगितली. दोघा संशयितांनी पीडितेच्या वडिलांना शिवीगाळ, दमदाटी करीत मारहाण केली. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस तपास करीत आहेत.