नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक – पुणे महामार्गावर महामार्गावर घरफोडी करुन दोन दुकाने व एका बँकेचे एटीएम फोडल्याची घटना घडली आहे. या चोरीत चोरट्यांनी रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा चार लाखाचा ऐवज चोरून नेला. पळसे गावात बुधवारी पहाटेच्या सुमारास ही चोरीची घटना घडली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घरफोडीची माहिती कळताच गावांच्या लोकांनी मोठी गर्दी केली. त्यानंतर पळसे गावचे माजी सरपंच नवनाथ गायधने यांच्यासह गावक-यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात धाव घेत घडलेल्या घटनेची माहिती दिली. याप्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शेळके हे करत आहेत.