नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जुन्या भांडणाची कुरापत काढून झालेल्या हाणामारीत एकाचा डोक्यात रॅाड घालून खून करण्यात आला आहे. संतोष जैस्वाल (३०) असे या भांडणात खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या खूनातील दोघे संशयित फरार झाले असून पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहे. सातपूर येथील गोरक्षनाथ रोडवरील काश्मीरे मळयाजवळ रात्री साडे अकरा दरम्यान ही घटना घडली. कालच अंबड येथे बापाने मुलीचा खून केल्याचे समोर आले होते. त्यानंतर ही दुसरी घटना घडली.
या घटनेबाबत समजलेली माहिती अशी की, दोन महिन्यापूर्वी संतोष जैस्वाल व संशयित यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला होता. त्यात मारहाण करण्यात आली होती. या घटनेचा राग मनात धरुन संशयितांना या जुन्या भांडणाची कुरापत काढली. रात्री या संशयितांनी संतोष जैस्वाल यांच्याशी भांडण सुरु केले. त्यानंतर रॉडने मारहाण केली. त्यात जैस्वाल यांचा जीव गेला. या घटनेमुळे परिसरात खळबळ निर्माण झाली आहे.