नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वारंवार होणार्या छळाला कंटाळून पीडित महिलेने न्यायालयात धाव घेऊन तक्रार अर्ज केला होता. या अर्जावर न्यायालयाने कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर भद्रकाली पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवाहितेने २५ ऑगस्ट २००९ ते १२ जानेवारी २०२३ यादरम्यान सासरी नांदत असताना आरोपींनी संगनमत करून छळ करुन मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याची तक्रार केली होती.त्यानंतर शफिक अकबर शेख (वय ४५), अकबर मजिद शेख (वय ८५, दोघे रा. अनुपमा सोसायटी, एन. डी. पटेल रोड, नाशिक), शाहीन रफिक सय्यद (वय ५०, रा. हरसूल, ता. पेठ), शमिम अज्जूभाई शेख (वय ४८, रा. आजाद चौक, जुने नाशिक), जरीना अब्दुल करीम शेख (वय ४६, रा. गांधीनगर, मालेगाव) व राबिया इस्माईल शेख (वय ४४, रा. खुशाल अपार्टमेंट, वडाळा रोड, नाशिक) यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अहिरे करीत आहेत.