नाशिक : राजीवनगर भागात चोरट्यांनी घरफोडून रोकडसह सोन्याचांदीचे दागिणेसह एक लाखाचा ऐवज लंपास केला. पंढरपूर येथे कुटुंबिय दिंडीत गेल्याची संधी साधत ही चोरट्यांनी ही संधी साधली. श्रीराम राजाराम सोनार (रा.मातोश्री बंगला,वैभव कॉलनी) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनार कुटूंबिय सालाबादाप्रमाणे यंदाही आषाढी एकादशी निमित्त पायी दिंडीने पंढरपूर येथे गेले होते. ४ ते १२ जुलै दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घरात कुणी नसल्याची संधी साधत बंद बंगल्यातील किचनच्या खिडकीचे गज उचकटून ही चोरी केली. बंगल्यात शिरलेल्या चोरट्यांनी बेडरूममधील कपाटात ठेवलेले २७ हजार ५०० रूपयांची रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ९७ हजार ५०० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास उपनिरीक्षक बारेला करीत आहेत.