नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – चाकूचा धाक दाखवत दहशत निर्माण करणा-या तरूणास पोलिसांनी औद्योगीक वसाहतीतील श्रमिकनगर भागातून ताब्यात घेऊन धारदार चाकू जप्त केले आहे. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साहिल उर्फ बच्चा दामू गुंबाडे (१९ रा.कोळीवाडा,पिंपळगाव बहुला) असे संशयिताचे नाव आहे. गुरूवारी (दि.१२) दुपारच्या सुमारास तो श्रमिकनगर येथील राधाकृष्ण नगर भागात आपले वर्चस्व कायम राहवे म्हणून नागरीकांना धारदारचाकूचा धाक दाखवित दहशत निर्माण करीत होता. गल्ली बोळात शिवीगाळ करीत असतांना याबाबतची माहिती पोलिसांना कळविण्यात आल्याने ही कारवाई करण्यात आली. घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी त्यास ताब्यात घेत चाकू जप्त केला असून याप्रकरणी अंमलदार वाबळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून मनाई आदेश आणि शस्त्रबंदी आदेशाचे उलंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार गायकवाड करीत आहेत.