नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जुने नाशिक येथील नानावली भागात जुगार खेळणा-या सात जणांविरुध्द पोलिसांनी कारवाई करुन गजाआड केले आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी संशयितांच्या ताब्यातून रोकड व जुगाराचे साहित्य असा सुमारे नऊ हजाराचा ऐवज हस्तगत केला आहे. मनोज रामभाऊ ढाकरजे (३७ रा.संत हरिबाबानगर,नायगावरोड सिन्नर),सागर बाबा जाधव (रा.राजस्विट मागे,आरटीओ कॉर्नर),प्रमोद बबन वहाडणे ,दिपक भाऊसाहेब चतुर (रा.दोघे बजरंगवाडी,पुणारोड),जालिंदर परशुराम अहिरे (रा. कातरवाडी,दिंडोरीरोड),गणेश रामदास बुरकुले (रा.रामुशेवाडी,वडाळागाव) व शरद रामनाथ काळे (रा.मोरवाडी,सिडको) अशी अटक करण्यात आलेल्या जुगारींची नावे आहेत. ट्रक्टर हाऊस रोडवरील मोकळय़ा भूखंडा शेजारी संशयित उघड्यावर जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार बुधवारी (दि.११) रात्री पोलिसांनी छापा टाकला असता संशयित पैसे लावून पत्यांच्या कॅटवर तिन पत्ती जुगार खेळतांना मिळून आले. संशयितांच्या ताब्यातून ८ हजार ९०० रूपयांची रोकड व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. अधिक तपास पोलिस नाईक सय्यद करीत
आहेत.