नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – निमाणी बस स्थानक भागात पार्क केलेल्या कारची काच फोडून चोरट्यांनी हॅण्डबॅग लंपास केली. या चोरी प्रकरणी प्रशांत सदाशिव पाटील (रा.बळीमंदिरासमोर,हनुमाननगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल असून पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बॅगेत सहा हजाराची रोकड, विविध बँकाचे एटीएम व महत्वाचे कागदपत्र होते. पाटील गुरूवारी (दि.१२) निमाणी बस स्थानक भागात आले होते. त्यांनी आपली होंडा अमेझ एमएच २० सीएस २९३३ कार पांझरा पोळच्या भिंतीस लागून पार्क केली असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी उभ्या कारच्या खिडकीची काच फोडून हॅण्ड बॅग चोरून नेली. अधिक तपास पोलिस नाईक गांगुर्डे करीत आहेत.