नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बजरंगवाडी भागात भांडण बघण्यासाठी आलेल्या महिलेस कुटुंबियांनी बेदम मारहाण करीत तिचा विनयभंग केल्याची घटना घडली. याप्रकरणी २७ वर्षीय पीडितेने तक्रार दाखल केली असून मुंबईनाका पोलिस ठाण्यात दांम्पत्यासह त्यांच्या चार नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुल्ताना शेख, समिर शेख व त्यांचे चार नातेवाईक अशी संशयितांची नावे आहेत. पीडिता व संशयित एकास सोसायटीतील रहिवासी आहेत. गेल्या शुक्रवारी (दि.६) संशयित व सोसायटीचे चेअरमन काझी यांच्यात भांडण सुरू होते. यावेळी पती घरात नसल्याने महिला भांडण बघण्यासाठी गेली असता ही घटना घडली. संतप्त टोळक्याने सुल्ताना शेख यांच्याशी झालेला वाद उकरून काढत पीडितेस शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी देत तिला लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेत संशयितांनी महिलेचे कपडे फाडून विनयभंग केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.