नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील नॉयलॉन मांजा विकणा-या तीन जणांवर पोलिसांनी कारवाई करत ३० हजार रूपये किमतीचा नॉयलॉन मांजा जप्त केला आहे. याप्रकरणी सातपूर, देवळाली कॅम्प आणि गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत अनिकेत अशोक कापूरे (२२ रा. मोतीवाला कॉलेज समोर,शिवशक्ती कॉलनी,ध्रुवनगर) हा युवक मंगळवारी आपल्या राहत्या घरात नॉयलॉन मांजा विक्री करतांना मिळून आला. त्याच्या ताब्यातून सुमारे १९ हजार ५०० रूपये किमतीचे मोनो सुपर कंपनीचे ३९ गट्टू मांजा हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस नाईक रविंद्र मोहिते यांनी दिलेल्या तक्रारीवरून गंगापूर पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात येवून संशयितास अटक करण्यात आली आहे. अधिक तपास अजय गंगाराम प्रधान (१९ रा.भंदूरे मळा,बुटकीरोड,म्हसोबा मंदिर,सातपूर) हा युवक मंगळवारी सायंकाळच्या सुमारास त्याच्या घर परिसरात काचेची कोटींग असलेला मांजा विक्री करतांना मिळून आला. त्याच्या ताब्यातून ३ हजार ६०० रूपये किमतीचा मांजा हस्तगत करण्यात आला असून अंमलदार मोहन भोये यांनी दिलेल्या तक्रारीवरून सातपूर पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार गायकवाड करीत आहेत. दुसरी कारवाई भगूर येथे करण्यात आली. पवन विलास चव्हाण (२१ रा.शनिमंदिरासमोर शिवाजी चौक भगूर) हा युवक मंगळवारी सायंकाळच्या सुमारास भगूर बस थांबा भागात नॉयलॉन मांजा विक्री करतांना मिळून आला. त्याच्या ताब्यातून ५ हजार ८५० रूपये किमतीचे ९ गटू हस्तगत करण्यात आले असून याप्रकरणी युनिट २ चे हवालदार गुलाब सोनार यांनी दिलेल्या तक्रारीवरून देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलिस नाईक बलकवडे करीत आहेत. पोलिस नाईक परदेशी करीत आहेत.