बेकायदा दारू विक्री करणा-या तीन विक्रेत्यांना पोलिसांनी केले गजाआड
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बेकायदा दारू विक्री करणा-या तीन विक्रेत्यांना पोलिसांनी गजाआड केले आहे. अंबड औद्योगीक वसाहतीस अन्य एका ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. यात सुमारे चार हजार रूपये किमतीची देशी विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी अंबड व देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिडकोतील पंडीत नगर भागात पहिली कारवाई करण्यात आली. वाल्मिक अभिमन्यू केदार (रा.दत्तमंदिरामागे मोरवाडी) हा इसम मंगळवारी रात्री पंडीतनगर येतील काळे मामा गिरणी भागात देशी दारूची विक्री करतांना मिळून आला. संशयिताच्या ताब्यातील पांढºया गोणीत सुमारे १ हजार १९० रूपये किमतीच्या देशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. दुसरी कारवाई इंदिरागांधी वसाहत क्र.१ मध्ये करण्यात आली. अजय उध्दव कणकुटे (रा.पाण्याच्या टाकीजवळ, इंदिरागांधी वसाहत) हा युवक मंगळवारी रात्री त्याच्या घर परिसरातील महालक्ष्मी किराणा समोर उघड्यावर बेकायदा दारू विक्री करतांना मिळून आला. त्याच्या ताब्यातून प्रिन्स संत्रा नावाच्या सुमारे ६६५ रूपये किमतीच्या १९ दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत दोन्ही घटनांप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून अधिक तपास अनुक्रमे पोलिस नाईक बनतोडे व शिरवले करीत आहेत. तिसरी कारवाई भगूर येथे करण्यात आली. शुभम सुकदेव तनपुरे (रा.वडगाव पिंगळा ता.सिन्नर) हा युवक मंगळवारी सायंकाळच्या सुमारास भगूर लहवित रोडवरील बलकवडे राईस मिल भागात असलेल्या हॉटेल रायबाच्या भिंतीलगत मद्याची विक्री करतांना मिळून आला. त्याच्या ताब्यातून सुमारे २ हजार २२० रूपये किमतीच्या बिअरच्या १२ बाटल्या जप्त करण्यात आल्या असून याप्रकरणी हवालदार विश्वास बागुल यांनी दिलेल्या तक्रारीवरून देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार कोल्हे करीत आहेत.
……….
हद्दपार केलेले असतांना शहरात वावर ठेवणा-या तडीपाराला अटक
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दोन वर्षासाठी हद्दपार केलेले असतांना शहरात वावर ठेवणा-या तडीपारास पोलिसांनी गजाआड केले आहे. सलमान युसूफ अत्तार (२० रा.भारतनगर) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सलमान अत्तार याची वाढती गुन्हेगारी लक्षात घेवून शहर पोलिसांनी त्याच्यावर काही महिन्यांपुर्वीच हद्दपारीची कारवाई केली आहे. जेलमधून बाहेर पडताच तो चोरी,घरफोडीसह जबरीचोरीचे गुन्हे करीत असल्याने त्याला शहर आणि जिह्यातून दोन वर्षासाठी तडिपार करण्यात आले आहे. मात्र त्याचा वावर शहरातच असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिस त्याच्या मागावर असतांना शिपाई अनिल आव्हाड यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्यास भारतनगर येथील त्याच्या घर परिसरातील मोकळया मैदानावर सापळा रचून त्यास जेरबंद केले. आव्हाड यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार सोनार करीत आहेत.