नाशिक : वेगवेगळया भागात पार्क केलेल्या दोन मोटारसायकली चोरट्यांनी नुकत्याच चोरून नेल्या. गेल्या काही दिवसापासून शहरात मोटारसायकल चोरीचे सत्र सुरूच आहे. या दोन्ही चोरीप्रकरणी पंचवटी व सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिली घटना सनराईज हॉस्पिटल भागात घडली. मुळचे बिड येथील सुशिलकुमार संपतराव चव्हाण (रा.हल्ली हनुमाननगर) हे गेल्या २२ जून रोजी आजारी नातेवाईकास भेटण्यासाठी सनराईज हॉस्पिटल येथे गेले होते. पार्किंगमध्ये लावलेली त्यांची यामाहा एमएच १२ जीएम २४३७ चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस नाईक शेवरे करीत आहेत. दुसरी चोरी अमृतधाम येथे घडली. अर्जुन सुभाष देसले (रा.गजानन रेसि.औदुंबरनगर) यांची एमएच १८ एजी ९३८७ मोटारसायकल गेल्या शनिवारी (दि.९) रात्री त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस नाईक लिलके करीत आहेत.